
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा सुरू असलेल्या फैजपूर शहरातील श्रीराम थिएटरवर आज अज्ञातांनी दगडफेक केल्याने फैजपूर शहरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने काही वेळात तणाव निवळला. (The Kerala Story)
फैजपूर शहरातील श्रीराम थिएटरमध्ये ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाचे शो सुरू आहे. शुक्रवारी १२ वाजेचा शो सुरु झाल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास सिनेमागृहाच्या मागील बाजूने अनोळखी काही जणांनी काही थेटरवर व प्रेक्षकांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. (The Kerala Story)
याची माहिती शहरात पसरताच थिएटर व सुभाष चौकात एकच गर्दी जमा झाली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे, एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर व ग्रामस्थांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. या घटनेप्रकरणी थिएटरचे चालक विक्की आठवणी यांनी खबर दिल्यावरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा :
- Friend In Cockpit : गर्लफ्रेंडला विमानाच्या कॉकपीटमध्ये बोलवणे एअर इंडियाच्या पायलटला पडले महागात
- T20 Team India : रोहित शर्माच्या हातातून T20 चे कर्णधारपद निसटणार, रवी शास्त्रींचा दावा
- Gyanvapi Mosque Case : ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या ‘शिवलिंग’प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय! पुरातत्व विभागाला दिले वैज्ञानिक सर्वेक्षणाचे निर्देश
The post जळगाव : फैजपूर शहरात 'द केरला स्टोरी' चित्रपटावरुन वादंग; सिनेमागृहावर दगडफेक appeared first on पुढारी.