जळगाव : बनावट खतविक्री प्रकरणी तपासणीचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

प्लॅन्टो दाणेदार नोंदणीकृत ट्रेडमार्कचा उपयोग करून अवैधरीत्या बनावट खतविक्री होत असल्याच्या तक्रारीवरून व प्रलशर बायोप्रॉडक्ट्स प्रा. लि., गोवा यांच्या याचिकेनुसार चौकशी तपासणीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

प्लॅन्टो दाणेदार खतांच्या ट्रेडमार्कच्या नावे इतर काही बनावट कंपन्या अवैधरीत्या खतांची राज्यात विक्री करीत असल्याचा मुद्दा प्रलशर बायो प्रॉडक्ट्स प्रा. लि. (प्लॅन्टो कृषितंत्र) यांनी मुंबई उच्च न्यायालयात विविध पुरावे, बिले व दाखले सादर करून उपस्थित केला होता. या बनावट प्लॅन्टो दाणेदारमुळे शेतकऱ्यांची संभाव्य फसवणुकीची शक्यता होती. त्यामुळे न्यायालयाने त्वरित चौकशी व तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार राज्यात धुळे, सोनगीर, शिरपूर व माजलगाव, जि. बीड येथे धाडी व चौकशी माेहीम राबविण्यात आली.

२० टन बनावट खते जप्त…

कोर्ट रिसिव्हर, स्थानस व प्रलशर बायोप्रॉडक्ट्स प्रा. लि.चे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही धडक मोहीम सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत २० टन बनावट खते आढळून आली असून, साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच यापुढेही बनावट खते जप्त करण्याबाबत मोहीम सूरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : बनावट खतविक्री प्रकरणी तपासणीचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश appeared first on पुढारी.