जळगाव : बहिणीला माहेरी नेताना अपघातात मामा-भाची जागीच ठार

जळगाव

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भाऊबिजेसाठी बहिणीला माहेरी नेत असताना भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील मामा-भाची जागीच ठार झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील रेल मारुती मंदिराजवळ घडली. मृतात सहा वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील रेल मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (एमएच 19 सीएच 5174) ला समोरून येणारा ट्रक (क्रमांक एचआर 56 बी 4688) ने जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी (दि. 28) दुपारी 3 च्या सुमारास घडली. यात 6 वर्षीय विधी कोळी आणि दुचाकीस्वार आबा कोळी (रा. दहिदुले, ता. धरणगाव) हे दोघे जागीच ठार झाले. बहीण गंभीर जखमी झाली, तर दीड वर्षीय चिमुकला मात्र सुखरूप आहे. अपघाताची माहिती मिळताच चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

The post जळगाव : बहिणीला माहेरी नेताना अपघातात मामा-भाची जागीच ठार appeared first on पुढारी.