जळगाव : बैलगाडीसाठी शेतकऱ्याकडून घेतले पैसे; लाचखोर हवालदार अडकला जाळ्यात

लाच www.pudharinews

जळगाव : शेतकऱ्याची बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या हवालदारास एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. लाचखोर हवालदार पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील तक्रादार शेतकऱ्याने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधितानी ती परत दिली नाही. उलट या प्रकरणात तक्रारदारावरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकऱ्याने तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरणानंतर तक्रारदाराला बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी पिंपळगाव हरेश्वरातील पोलिस हवालदार राकेश खोंडे यांनी ५ हजारांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराकडे चार हजार असल्याने त्यावर तडजोड झाली.

तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची मंगळवारी (दि. ४) पडताळणी झाल्यानंतर पाचोरा शहरातील एका चौकात तक्रारदाराला बोलावण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. एका चहाच्या टपरी व्यावसायीकाकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पथकाने आधी पाटील नामक चहा व्यावसायिकाला व नंतर आरोपी हवालदार राकेश खोंडे यास अटक केली.

हेही वाचा :

The post जळगाव : बैलगाडीसाठी शेतकऱ्याकडून घेतले पैसे; लाचखोर हवालदार अडकला जाळ्यात appeared first on पुढारी.