जळगाव : बोदवडमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण

मुलीचे अपहरण,

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून अपहरण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. बुधवारी (दि.२४) पहाटे ३ च्या सुमारास मुलगी घरात झोपलेली असताना अज्ञाताने तिला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. नातेवाइकांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नसल्याने बोदवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव : बोदवडमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण appeared first on पुढारी.