Site icon

जळगाव : बोदवड येथे लाचखोर पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहात अटक

जळगाव : खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने १६ हजार रूपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बोदवड तहसील कार्यालय आवारात लाच घेणाऱ्या पोलिसाला त्याच्या पंटरसह आज रंगेहाथ अटक केली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड पोलीस स्थानकात एका व्यक्तीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मदत करण्याच्या नावाखाली हवालदार वसंत नामदेव निकम यांनी त्या व्यक्तीकडे २० हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोड करून हा आकडा १६ हजार रूपयांवर निश्‍चीत झाला.

सापळा रचून केली कारवाई…
दरम्यान, संबंधीत व्यक्तीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार आज सापळा रचण्यात आला. यानुसार पथकाने तहसील कार्यालयाच्या आवारात हवालदार वसंत नामदेव निकम आणि त्यांचा पंटर एकनाथ कृष्णा बाविस्कर यांना रंगेहात अटक करण्यात आली. या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संजोग बच्छाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : 

The post जळगाव : बोदवड येथे लाचखोर पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहात अटक appeared first on पुढारी.

Exit mobile version