जळगाव : भरदिवसा महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

चाकूने हल्ला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर भरदिवसा चाकू हल्ला केल्याची घटना भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील हिमालया पेट्रोल पंपांसमोर घडली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील नाहाटा महाविद्यालयात इयत्ता १२ वी मध्ये शिकत असलेला आदित्य कैलास सावकारे याच्यावर हिमालया पेट्रोल पंपासमोर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच बाजारपेठेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड त्यांचे सहकारी प्रशांत परदेशी, निलेश चौधरी, तुषार पाटील, मिलिंद कंक, अतुल कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला ट्रॉमा केअर सेंटर मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : भरदिवसा महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर चाकूहल्ला appeared first on पुढारी.