जळगाव : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Road Accidents

जळगाव, पुढारी वृत्तसेवा :  धरणगावकडून अमळनेरकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना भोणे फाट्याजवळ घडली. जखमीस तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सतीश जस्वल असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे  नाव आहे.

धरणगाव येथून अमळनेरकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात सतीश जस्वल यांचा मृत्यू झाला तर संजय सीताराम महाजन हे गंभीर जखमी झाले आहे. जखमीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

The post जळगाव : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.