
भुसावळ : भुसावळकडून वरणगावाकडे असलेल्या हरताळा देवस्थान दर्शनासाठी जाणाऱ्या दांपत्याच्या वाहनाला आज (दि. ५) अपघात झाला. या अपघातात पती जागीच ठार झाला असून पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर वरणगाव शहराजवळ घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील नवमहाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक ललित प्रभाकर नेमाडे हे आपल्या पत्नीसह आज पौर्णिमा असल्याने हरताळा येथील देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान वरणगाव बायपास वरून जाणाऱ्या महामार्गावर त्यांच्या दुचाकीला वाहनाने जोरदार धडक दिली. यात ललित प्रभाकर नेमाडे (वय ४८) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सौभाग्यवती या गंभीर जखमी झाल्या आहेत.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. यासोबत भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे हे आपल्या सहकाऱ्यांसह अपघात स्थळी दाखल झाले आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या संदर्भात वरणगाव पोलीस स्थानकात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा :
- नंदुरबार : नर्मदेच्या दरीत अडकलेल्या युवकाची पंधरा तासांनी सुटका
- Google Pixel Fold : गुगलचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन ‘पिक्सेल फोल्ड’ लवकरच लाँच होणार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
- Encounter in Rajouri (J&K) | जम्मू काश्मीरमध्ये चकमक, दोन जवान शहीद तर ४ जखमी
The post जळगाव : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर जखमी appeared first on पुढारी.