जळगाव : भरधाव वाहनाच्या धडकेत वृध्दाचा म़त्यू

अपघात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

कामावरून सायकलने घरी जात असलेल्या ७० वर्षीय वयोवृध्दाला भरधाव वाहनाने धडक दिल्याची घटना औरंगाबाद मार्गावरील काशिनाथ चौकाजवळ घडली आहे. तातडीने वृध्देला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात मंगळवारी (दि. १८) एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुदेव वामन महाजन (७०, रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव असून ते एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट नगरामध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीला होते. सोमवारी (दि. १७) सकाळी ७ वाजता सुमारास ते रात्रपाळी ड्युटी करून सायकलने जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील काशिनाथ चौकाजवळील पेट्रोल पंपाच्या बाजूने घरी जात होते. यादरम्यान अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत वासुदेव महाजन यांचा मुलगा नितीन महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव : भरधाव वाहनाच्या धडकेत वृध्दाचा म़त्यू appeared first on पुढारी.