
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भाजप आणि जनसंघाचा इतिहास जर पाहिला, तर भाजपच्या जागाच निवडून येत नव्हत्या. त्यांना आजही दक्षिण भारतात स्थान नाही. अनेक ठिकाणी भाजपचे डिपॉझिट गुल झाल्याची अनेक उदाहरणे आहेत, तर अनेक राज्यांत भाजपची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. त्यामुळे भाजपची सद्यस्थिती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.
कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचारादरम्यान राष्ट्रवादीवर टीका केली होती. राष्ट्रवादीचे पार्सल महाराष्ट्रात पाठवा, असे म्हणाले होते. यावरून आ. एकनाथ खडसे यांनी पलटवार केला आहे. दक्षिणेतील अनेक राज्यांत भाजपला फारसा प्रतिसाद मिळत नाही. मग, अशा ठिकाणी भाजपचे पार्सल परत पाठवले असे म्हणायचे का? असा टोला आ. खडसेंनी फडणवीसांना लगावला.
विरोधी पक्षांचे मनोबल वाढले…
कोणताही राजकीय पक्ष प्रयत्न करतच असतो. भारतीय जनता पक्षाचे अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत. भाजपची परिस्थिती खूप नाजूक झालेली आहे. ‘गिरा तो भी टांग उपर’ अशा स्वरूपाचे देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य दिसत आहे. कर्नाटकात काँग्रेसला यश मिळाले म्हणजे भाजपविरोधी पक्षांना यश मिळाले. त्यामुळे विरोधी पक्षांचे मनोबल वाढले असून, देशात विरोधी पक्ष एकत्र राहिला, तर बर्यापैकी यश मिळू शकेल, असा विश्वास वाढत आहे. आता 10 वर्षांत आपण जे चित्र देशात पाहिले, यापेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको, असेही खडसे म्हणाले.
हेही वाचा:
- Maharashtra CM Eknath Shinde | बेदरकारपणे वाहन चालवणे अजामीनपात्र गुन्हा ठरणार, मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक
- मुंबईत गॅस गळतीमुळे घराला आग; ६ जण भाजून जखमी
- Fatafati Movie : बॉडी मेकअप, प्रोस्थेटिक्स न वापरता रिताभरीने वाढवले होते २५ किलो वजन
The post जळगाव : भाजपची अवस्था म्हणजे गिरे तो भी टांग उपर...एकनाथ खडसे यांची टीका appeared first on पुढारी.