जळगाव : भुसावळ-पाचोरा तिसर्‍या रेल्वेमार्गाचे निरीक्षण

जळगाव www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भुसावळ-जळगाव व जळगाव-पाचोरा या तिसर्‍या रेल्वेलाइनचे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी गुरुवारी (दि.२५) निरीक्षण केले. या निरीक्षण अहवालानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

मुख्य सुरक्षा अधिकारी यांची विशेष गाडी भुसावळ येथे पहाटे साडेपाचला पोहोचली. त्यानंतर लगेच ८ वाजता जळगावसाठी रवाना होऊन नंतर तिसऱ्या लाइनवर आल्यानंतर विशेष गाडी म्हसावाद येथे निघाली. सहा मोटर ट्रॉलीने सर्व अधिकारी निरीक्षणासाठी रवाना झाले. मुख्य सुरक्षा अधिकारी मनोज अरोरा यांनी १-१ किलोमीटर अंतरावर निरीक्षण केले. यादरम्यान मार्गात लागणाऱ्या पुलांचेही त्यांनी निरीक्षण केले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काही आवश्यक सूचनाही त्यांनी केल्या. गुरुवारी (दि.२५) पहिल्या फेजमधे भुसावळ ते माहेजीपर्यंत निरीक्षण करण्यात आले. तर शुक्रवारी (दि.२६) माहेजी ते पाचोरा निरीक्षण केले जाणार आहे. शुक्रवारी या मार्गावरून विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार असून, हा मार्ग रेल्वेगाडी चालण्यासाठी योग्य आहे किंवा नाही? याची चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी झाल्यावर हा मार्ग वाहतुकीसाठी कधी सुरू करायचा? हा निर्णय होणार आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : भुसावळ-पाचोरा तिसर्‍या रेल्वेमार्गाचे निरीक्षण appeared first on पुढारी.