Site icon

जळगाव : महागाई, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे रास्ता रोको आंदोलन

जळगाव : केंद्र शासनाकडून होत असलेल्या सततच्या गॅस दरवाढ व महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस जळगाव जिल्हातर्फे केंद्र शासनाविरोधात आकाशवाणी चौक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी सिलेंडर व निषेधाच्या मजकूराचे लिहिलेले फलक दाखवून मोदी सरकारविरुध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्र शासनाने लवकरात लवकर गॅस दरवाढ मागे घेऊन गॅस दर कमी न केल्यास अजून तीव्र व व्यापक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांना दिला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी, अमोल कोल्हे, इब्राहीम तडवी, रमेश बहारे, किरण राजपूत, मिनाक्षी चव्हाण, सीमा गोसावी, लता सावकारे, ऍड. जयश्री पाटील, रिझवान खाटीक, रेखा जाधव, छाया सावळे, वर्षा राजपूत, भगवान सोनवणे, रहीम तडवी, चेतन पवार, योगेश साळी, हितेश जावळे, राहुल टोके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

The post जळगाव : महागाई, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे रास्ता रोको आंदोलन appeared first on पुढारी.

Exit mobile version