जळगाव : मुक्ताईनगरात भरधाव डंपरची बसला धडक, १० प्रवासी जखमी

जळगाव,www.pudhari.news

मुक्ताईनगर : भरधाव डंपरने बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक गावाच्या जवळ ही घटना घडली आहे.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक गावाच्या पुढे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भरधाव डंपरने बसला धडक दिली. यात एमएच१९ सीवाय ५२७२ क्रमांकाच्या डंपरने एमएच १३ सीयू ६९३१ क्रमांकाच्या बसला धडक दिली. या अपघातामध्ये १० जण जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमी

जखमींमध्ये बसचे चालक नरेंद्र जगन्नाथ देशमुख ( रा. वरणगाव ) तसेच वाहक (कंडक्टर) प्रितीमा शांताराम अहिरे ( रा. भुसावळ) यांच्यासह सुनील बाबूराव काजनेकर ( उमापूर), बाबूराव दामोदर ठोसर व यमुनाबाई बाबूराव ठोसर ( रा. चिंचखेडा बुद्रुक ); गणेश रामकृष्ण कोळी (रा. पारंबी), इस्माईल खॉ इम्रान खॉ, सुधाकर नारायण अहुळकार ( रा. पारंबी ), निवृत्ती सापुर्डा ढोण व शुभांगी तुषार अहुळकार यांचा समावेश आहे.

ग्रामस्थांची घटनास्थळी धाव

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसेना उप-तालुका प्रमुख नवनीत पाटील, कुर्‍हा शहर प्रमुख पंकज पांडव, युवासेना उपजिल्हा प्रमुख सतीश नागरे, दिलीप भोलाणकर, अविनाश वाढे, ज्ञानेश्‍वर तायडे, शेख अकबर, विष्णू तायडे यांनी जखमीला मदत केली. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

The post जळगाव : मुक्ताईनगरात भरधाव डंपरची बसला धडक, १० प्रवासी जखमी appeared first on पुढारी.