जळगाव : यात्रोत्सवात शिक्षिकेची सोन्याची पोत लंपास

सोनसाखळी चोर www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञाताने लांबवल्याची घटना धरणगाव शहरात घडली. याबाबत पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव शहरात मरीमाता मंदिर येथे यात्रोत्सव सुरू आहे. यात्रोत्सवात भाविकांची वर्दळ असून दर्शनासाठी महिलांसह भाविकांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या आहेत. या गर्दीचा फायदा घेत रजनी हरियाचंद्र सूर्यवंशी (६४,मातोश्रीनगर, धरणगाव) यांच्या गळ्यातील ८७ हजार ५०० रुपये किंमतीची २५ ग्रॅम सोन्याची पोत चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात रजनी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल नाना ठाकरे हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव : यात्रोत्सवात शिक्षिकेची सोन्याची पोत लंपास appeared first on पुढारी.