जळगाव : यावलमध्ये वीजपडून शेतकर्‍याचा मृत्यू

मृत्यू,www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शेतात काम करीत असताना अंगावर वीज कोसळून शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील आमोदा येथे बुधवारी (दि. 3) दुपारी एक ते दोनच्या सुमारास घडली.जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शेती मशागतीच्या कामांना आता वेग आला आहे. आमोदा येथील ज्ञानदेव धनू चौधरी हे आपल्या शेतात पिकाची मशागत करत होते. यावेळी अचानक ढगांचा व विजांचा कडकडाट होऊन एक ते दोनच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने चौधरी जागीच गतप्राण झाले.

हेही वाचा :

The post जळगाव : यावलमध्ये वीजपडून शेतकर्‍याचा मृत्यू appeared first on पुढारी.