जळगाव : रावेरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, सहा जणांविरोधात गुन्हा

लैंगिक अत्याचार

जळगाव : रावेर शहरातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन तरुणीला रावेर तालुक्यात पळवून नेत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसांत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. नराधमांनी पीडीतेचा अत्याचारादरम्यान व्हिडिओ बनवला व तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला तसेच पीडीता त्यातून गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपातही करण्यात आल्याचा आरोप आहे.

या संदर्भात 17 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, 2 ते 19 जानेवारी 2022 दरम्यान संशयीत रवी छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल छपरीबंद, गौरव जावे यांनी बलात्कार करण्याच्या उद्देशाने पळवून नेत पाल येथील निर्जनस्थळी नेत सामूहिक बलात्कार केला व नंतर रावेर येथे संशयीत आरोपी रवी छपरीबंद याने त्याच्या घरी डांबून ठेवले. याठिकाणी देखील चौघांनी पीडीतेवर वारंवार बलात्कार केला. तसेच चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिविगाळ करून अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवला.

पीडीतेने संशयीतांच्या ताब्यातून स्वत:ची सुटका केल्यावरदेखील चौघा संशयीत आरोपींनी फोन करीत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून अधून-मधून बोलावलेल्या जागेवर पीडीतेवर अत्याचार केला. या अत्याचाराने पीडीतेला गर्भधारणा झाली तेव्हा तिने नाईलाजाने गोळ्या घेवून गर्भपात केला. याप्रकरणी रवी छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल, गौरव, रवी छपरीबंदची पत्नी आणि धीरज (सर्व. रा. रावेर) यांच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत

हेही वाचा :

The post जळगाव : रावेरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, सहा जणांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.