जळगाव : रावेर तालुक्यात सुकी नदीत तरुण बेपत्ता

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुरात सुकी नदीच्या पात्रात एक तरूण बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाचा एनडीआरएफच्या पथकाकडून शोध घेतला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच, तहसीलदार बंडू कापसे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच बेपत्ता झालेल्या युवकाचा एसडीआरएफ मार्फत शोध घेण्याच्या सूचना केल्या आहेत. रावेर तालुक्यातील रोझोदा येथील रवींद्र दगडू चौधरी हा तरूण गारबर्डी धरण परिसरामध्ये काल (दि. २२) सायंकाळी पोहायला गेला होता. पोहत असताना अचानक तो नदी पात्रात बेपत्ता झाला. सुकी नदीला दोन्ही काठ भरून पाणी वाहत असुन यात बेपत्ता युवकाचा एसडीआरएफची टीम शोध मोहीम राबवित आहेत. तर आज सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा तालुक्यात मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

The post जळगाव : रावेर तालुक्यात सुकी नदीत तरुण बेपत्ता appeared first on पुढारी.