
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची निवड करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी नियुक्तीचे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र देण्यात आले होते. अखेर त्यास मंजुरी देण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांचा राजकीय कारकिर्दीचा दांडगा अनुभव लक्षात घेता राष्ट्रवादी पक्षाने त्यांना ही मोठी जबाबदारी सोपविली आहे. यासोबतच खडसे यांना अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. खडसेंच्या माध्यमातून जळगावमध्ये राष्ट्रवादीला अधिक बळ मिळेल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल. भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न
भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने पुन्हा मोठी जबाबदारी दिली आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. एकनाथ खडसे यांच्या नियुक्ती करत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा:
- Usman Khawaja : आशियाई मैदानांवर 150+ धावा फटकावणारा तिसरा ‘कांगारू’
- Deepika Padukone: ऑस्करसाठी रवाना झाली दीपिका, लूक व्हायरल
- Stock Market Crash | सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना ३ लाख कोटींचा फटका, जाणून घ्या घसरणीमागची कारणे?
The post जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ खडसेंची निवड appeared first on पुढारी.