
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : भुसावळहुन नाशिककडे जाणारी भुसावळ – देवलाली शटल ही रेल्वे गाडी जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभी असताना डब्याच्या बॅटरी पॅनलला अचानक आग लागली. यावेळी प्रवाशांनी डब्यातून बाहेर पडत संपूर्ण बोगी खाली केली.
भुसावळ देवलाली पॅसेंजर जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर सायंकाळी सहाच्या सुमारास आली. गाडी उभी असताना डब्यातील बॅटरी पॅनलमधून धूर येत असल्याचे काही प्रवाशांच्या निदर्शनास आले. यानंतर प्रवाशांनी ही बाब आर.पी.एफ कर्मचाऱ्यांना सांगितले असता आर.पी.एफ कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत तांत्रिक कर्मचाऱ्यांना पाचारण केले. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी या ही आग विझवून बॅटरी पॅनलची दुरुस्ती केली.
पुढील अनर्थ टळला…
डब्यात आग लागल्याचे समजतात प्रवाशांनी डब्यातून बाहेर उतरत संपूर्ण डबा खाली केला. रेल्वेला आग लागल्याची बातमी कळताच प्रवाशांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आर.पी.एफ. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.
हेही वाचा;
- IPL 2023 : ‘हा’ मोठा खेळाडू बनला मुंबई इंडियन्सचा सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक
- ICC Ranking : आर. अश्विन, श्रेयस अय्यरची आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये झेप!
- पुणे : कानगाव, कडेठाण क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधा, आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
The post जळगाव रेल्वे स्थानकावर ‘देवळाली शटल’च्या डब्यास आग appeared first on पुढारी.