जळगांव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वावळदा शिवारातील शेतात रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यानी रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर व रोटर हीटर पळवून नेल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी (दि. १५) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चोरुन नेलेले ट्रॅक्टर एरंडोल तालुक्यात सापडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिवाळीचा उत्सव सुरू असताना पाडव्याच्या रात्री वावळदा ते म्हसावद दरम्यान ईश्वर मन्साराम पाटील यांच्या शेतात बिलवाडी येथील पांडुरंग पंडित पाटील (वय 52) हे रखवाली करत होते. रात्री अज्ञात चोरट्याने शेतात ठेवण्यात आलेले ट्रॅक्टर व रोटर हीटर चोरून नेले त्यांना अडविले असता अज्ञात चोरट्याने रखवालदार पांडुरंग पाटील यांच्या डोक्यात लोखंडी वस्तू घालून खून केलं अज्ञात चोरटे तेथून पसार झाले शेतमालक यांच्या मुलगा रवींद्र पाटील हा सकाळी दूध काढण्यासाठी शेतात आला असता सदरची घटना उघडकीस आली यानंतर गावच्या पोलीस पाटील सुवर्णा उंबरे व पोलिसांना याची माहिती देण्यात आली. भाऊबीजेच्या सकाळी ही घटना माहिती पडल्याने गावावर शोककळा पसरली होती.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी पोलीस निरीक्षक हिरे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी व अन्य सहकारी फॉरेन्सिक लॅब श्वान पथकाने भेट दिली. शेतातून चोरीला गेलेले ट्रॅक्टर हे एरंडोल तालुक्यातील खडकी फाटा येथे मिळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे
The post जळगाव : वावळदा येथे शेतातील रखवालदाराचा खून करुन ट्रॅक्टर चोरी appeared first on पुढारी.