जळगाव : विजेच्या तारा अंगावर पडल्याने शेतकऱ्यासह एक बैल जागीच ठार

विजतारा www.pudhari.news
जळगाव: पुढारी वृत्तसेवा
बैलगाडीने शेतात जातांना विद्युत खांबावरील विज तारा तुटून पडल्याने शेतकऱ्यासह एक बैल जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.१) सकाळी साडेआठच्या सुमारास यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक शिवारात घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यशवंत महाजन (६२, रा. चिखली बुद्रुक, ता. यावल) हे गुरुवारी (दि. १) सकाळी ८.३०च्या सुमारास बैलगाडीने चिखलीबुद्रुक शिवारातील शेतातील रस्त्याने जात असतांना अचानक विजतारा तुटून बैलगाडीवर पडली. वीजेच्या तीव्र झटक्याने महाजन यांच्यासोबत एक बैल जागीच ठार झाला आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व इलेक्ट्रीक वायरमन यांनी धाव घेत खांब्यावरील विद्यूत प्रवाह बंद केला. तसेच तातडीने महाजन यांना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषीत केले. यासंदर्भात फैजपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकेश सानप  पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव : विजेच्या तारा अंगावर पडल्याने शेतकऱ्यासह एक बैल जागीच ठार appeared first on पुढारी.