सश्रम कारावास www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ३ वर्षांचा सश्रम कारावास आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे.

पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या व जुलै २०१७ मध्ये इयत्ता आठवीत शिकणारी अल्पवयीन मुलीचा विजय प्रकाश घोडेश्वर (१९, रा. भडगाव, जि. जळगाव) याने शाळेत व गावाताील इतर रस्त्यांवर पाठलाग करून तिला थांबवले. तसेच भररस्त्यातच तिचा हात पकडला. यासंदर्भात पीडित मुलीच्या मामाने संशयित आरोपीला पकडून पाचोरा पोलिस ठाण्यात जमा केले. याबाबत पीडित मुलीच्या मामाच्या फिर्यादीवरून विजय घोडेस्वार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र जळगाव जिल्हा सत्रन्यायालयात दाखल करण्यात आले. त्यानुसार साक्ष व पुराव्याअंती न्यायालयाने विजय घोडेस्वार यास दोषी ठरवत त्याला विविध कलमांन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि ८ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचा:

The post जळगाव : विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास appeared first on पुढारी.