जळगाव : विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, आरोपीस अटक

अत्याचार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

चोपडा तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीला पळवून नेत दोन महिने अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तरुणीने चोपडा शहर पोलिसात तरुणाविरोधात तक्रार दिल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.

चोपडा तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी विलेश दारासिंग पावरा (दोंदवाडे, ता.शिरपूर) याने प्रेमसंबध निर्माण करीत विवाहाचे आमिष देत पळवून नेले. नंदुरबार जिल्ह्यात व शिरपूर तालुक्यातील एका गावात नेत गुन्हा दाखल झाल्यापासूनच्या आधीच्या दोन महिन्यांपर्यंत वारंवार अत्याचार केला. फसवणूक झाल्याने तरुणीने तातडीने चोपडा पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने फिर्यादीवरून संशयीत आरोपी विलेश दारासिंग पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव : विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, आरोपीस अटक appeared first on पुढारी.