
जळगाव : पुढारी वृत्तसेवा : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाने अवघा देश हादरलाय. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकर या तरुणीचा लिव्ह-इन पार्टनर आफताबने गळा दाबून खून केला. या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.१९) जळगाव महानगर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात श्रध्दाच्या खून प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपीला फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या वेळी जिल्हा संयोजक मयूर माळी, चेतन नेमाडे, शिवा ठाकूर, भवानी पाटील, कुणाल कोळी, अश्विन पाटील, केशव पाटील, ऋषिकेश रावेरकर, शुभम तायडे, जयेश पाटील, कुंदन कोळी, गणेश बाविस्कर, हरीश बुचा, रिषभ शुक्ला, कल्पेश जयस्वाल, ऋषिकेश पाटील व पीयूष माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?
- नवाजुद्दीनच्या ‘हड्डी’ चं नवीन पोस्टर पाहिलंत का? या अवतारात पाहून चाहतेही झाले अवाक
- अभिनेत्री कनिष्काचा धक्कादायक खुलासा, ‘लिव्ह इन’मध्ये असताना लग्नाबद्दल विचारंल आणि…;
- Urfi Javed : आजकालचे तरुण अंथरूणात जावून उर्फीचे फोटो पाहतात : लेखक चेतन भगत असे का म्हणाले?
The post जळगाव : श्रध्दाच्या मारेकऱ्याला फाशी द्या; 'अभाविप'चे आंदोलन appeared first on पुढारी.