जळगाव : संतापाच्या भरात सासऱ्याने सुनेला गळा दाबून संपवले

गळा दाबून केला सूनेचा खून,www.pudhari.news

जळगाव  : कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. गावात उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम पुंजाजी चौधरी (वय ५६) रा. शिवशक्ती नगर, टाकळी प्रचा ता. चाळीसगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर कविता गोकुळ चौधरी (वय-२५) मयत महिलेचे नाव आहे. उत्तम चौधरी हे सून कविता सह राहत असून चौधरी यांचा सूनेसोबत कौटुंबिक वाद निर्माण झाला. या वादातून उत्तम चौधरी यांनी संतापाच्या भरात सून कविताचा गळा, नाक व तोंड दाबून तिला जीवे मारले.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात उत्तम याने स्वतः हजर राहून खुनाची कबुली दिली. चाळीसगाव पोलिसांनी त्यांना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

The post जळगाव : संतापाच्या भरात सासऱ्याने सुनेला गळा दाबून संपवले appeared first on पुढारी.