
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१०) जळगावात आमदार लता सोनवणे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी सत्तासंघर्षावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…मी तुम्हाला हात जोडतो, सर्वांना शुभेच्छा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी ४ वाजता जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चिमणराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रांताधिकारी महेश सुधाळकर आदि उपस्थित होते.
उद्या सत्याचाच विजय होणार : मुनगंटीवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी एकाच वाक्यात आपली प्रतिक्रिया देत अधिक बोलणे टाळले. तर खासदार संजय राऊत यांनी सरकार पडणार असल्याच्या टिकेबाबत वनमंत्री सुधीर मुगगंटीवार यांना छेडले असते ते म्हणाले की, मुंगेरीलालचे डीएनए असलेले काही नेते राज्यात आहेत. सुप्रीम कोर्टात कोणत्या मॅटरवर केस आहे? असा प्रश्न उपस्थित करीत ते म्हणाले की, असे आमदारांना अपात्र करता येत नाही. उद्या सत्याचाच विजय होणार असून काहीही सत्तासंघर्ष नाही, असेही देखील सांगत जनतेच्या विकासासाठी आम्ही काम करीत आहोत व यापुढेही काम करीत राहू, असे सांगितले.
हेही वाचा;
- Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी ६५.६९ टक्के मतदान, राज्यात पुन्हा भाजप की सत्तांतर?
- Karnataka Election Exit Poll 2023 : कर्नाटकात काँग्रेस! जाणून घ्या एक्झिट पोल…
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: 13 ते 22 जून दरम्यान होणार यूजीसी नेट परीक्षा, अर्ज भरण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख
The post जळगाव : सत्तासंघर्षावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; हात जोडतो, सर्वांना शुभेच्छा..! appeared first on पुढारी.