जळगाव : सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतील सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वतंत्रपणे लढवल्या जाणार आहेत. तरी तालुकाध्यक्षांकडून इच्छुक उमेदवार असणाऱ्या सक्षम उमेदवारांचा सर्व्हे करून तशी शिफारस जिल्हास्तरावर पाठवावी, आम्ही त्यांनाच उमेदवारी देऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी केली.

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर पालिका निवडणुकी संदर्भात इच्छुक उमेदवारांची बैठक रावेर कृषी उपन्न बाजार समिती येथे झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्षांनी सांगितले की, आगामी निवडणुकीत रावेर तालुक्यातील इच्छुकांची नावे जिल्हास्तरावरुन परस्पर घोषीत करून नका प्रोटोकॉलनुसार तालुकास्तरावरील राष्ट्रवादीच्या पदधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याची विनंती तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी केली.

शौचालय भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजणार

बैठकीत वाघोड गणाचे इच्छुक उमेदवार गणेश महाजन यांनी भाजपावर चांगलाच प्रहार केला. निधी वाटप तसेच शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरण भाजपाच्या कार्यकाळात झाला आहे. यामुळे रावेर तालुक्याचे नाव पूर्ण बदनाम झाले आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला घेरण्यासाठी हाच मुद्दा घेऊन सर्वांनी जनतेसमोर जावे, याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होणार असल्याचे मत त्यांनी बैठकीत व्यक्त केले.

बैठकीला यांची होती उपस्थिती

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष रेखा चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, रमेश पाटील, सुनिल कोंडे, दीपक पाटील, अटवाडा सरपंच गणेश महाजन, मायाबाई बाऱ्हे, किशोर राणे, मंदार पाटील, सचिन पाटील, योगेश पाटील, सोपान पाटील, प्रकाश पाटील, योगिता वानखेडे, पंकज वाघ, गोटू शेट, सचिन पाटील, राजेश वानखेडे, पकंज यवेले, काझी आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

The post जळगाव : सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार appeared first on पुढारी.