जळगाव : सहा मुलांच्या बापाचा तरुणीवर अत्याचार ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अत्याचार

चोपडा : पहिली पत्नी असताना व तिला सहा अपत्य असतानाही चोपडा तालुक्यातील २९ वर्षीय तरुणीची लग्नाच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी पतीसह सात संशयीतांविरोधात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावातील २९ तरुणीशी संशयीत आरोपीने लग्नाच्या आमिषाने २०१६ ते २०२१ पर्यंत अत्याचार केला व या पाच वर्षाच्या काळात पीडीतेला तीन मुले झालीत. मात्र आरोपीचे यापूर्वीच लग्न झाले असून त्यास पहिल्या पत्नीपासून सहा अपत्ये झाल्याचे लक्षात आले. ज्या तरुणासोबत पाच वर्ष संबंध ठेवले, त्याला आधीच सहा अपत्य होती, हा प्रकार समोर आल्याने तरुणीला मोठा धक्का बसला.

पीडितेला देखील ३ मुलं झाली …

या तरुणाचे आधीच लग्न झालेले होते. पहिल्या पत्नीपासून त्याला सहा अपत्य होती. तरी देखील त्याने एका २९ वर्षीय तरुणीला वेळेवेळी लग्नाचे आमिष देत तिच्यावर अत्याचार केले. या पाच वर्षांच्या अत्याचारातून पीडितेला देखील ३ मुलं झाली आहेत. एवढेच नव्हे तर तरुणाच्या घरातील इतर सदस्यांनी पीडितेला घरातून माहेरी हाकलून देत तिची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. तरुणीने याप्रकरणी न्यायालयात तक्रार केली. या तक्रारी नुसार या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये बुधवारी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत.

हेही वाचा :

The post जळगाव : सहा मुलांच्या बापाचा तरुणीवर अत्याचार ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.