
जळगाव : जिल्ह्यातील सिंचन बिगर सिंचनाकरिता महत्त्वाच्या अशा भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने गुरुवारी सकाळी 10 वाजता उघडण्यात आले आहे. त्यामुळे तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या शेवटी धरणातील पाणीसाठा जेमतेम शिल्लक होता. तसेच पावसाला उशिरा सुरवात झाल्याने मधल्या काळात धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत झाल्याने जलसंकटाचा सामना करावा लागतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु उशिरा का होईना मध्यप्रदेशात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने तापी नदीला पूर आल्याने धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे भुसावळ शहरासह तापी नदीवर अवलंबून असलेल्या गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार आहे. पाऊस सुरूच असल्याने पाण्याची आवक वाढत असल्याने हतनूर प्रशासने धरणाचे चार दरवाजे उघडले आहे. त्यामुळे 136.00 क्युमेक्स (4803) क्यूसेक विसर्ग तापी नदी पात्रता सोडण्यात येणार आहे.
हेही वाचा :
- Stolen Tomatoes : शेतकऱ्यांनो टोमॅटो सांभाळा; शेतातील लाखो रुपयांच्या टोमॅटोवर चोरट्यांचा डल्ला…
- Ulhasnagar Municipal Corporation Scam : उल्हासनगर महापालिकेच्या ऑनलाईन निविदा प्रक्रियेत घोटाळा
- शेळगाव : अकरा महिन्यांपासून भरतोय शिक्षकाविना वर्ग
The post जळगाव : हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.