
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात दोन गटात झालेल्या वादातून तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. या घटनेने तांबापुरा भागात ऐन दिवाळीत तणावपूर्व शांतता पसरली. संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय २०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील तांबापुरा परीसरातील सिकलकर वाडा भागात राहणाऱ्या संजयसिंग प्रदीपसिंग टाक या तरुणाचा सोमवारी रात्री फटाके फोडण्यावरून मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांच्यासोबत वाद झाला होता. मंगळवारी रात्री संजयसिंग हा घराबाहेर गेला असताना मोनूसिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोनसिंग बावरी यांनी त्याच्यावर चॉपरने हल्ला केला. संजयसिंग याला वाचविण्यासाठी त्याचे वडील प्रदीपसिंग टाक, भाऊ करणसिंग टाक, काका बलवंतसिंग टाक, गल्लीतील व्यक्ती बग्गासिंग टाक यांनी धाव घेतली. मात्र त्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला. त्यामुळे तेदेखील जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात…
घटनास्थळी दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक झाल्याची माहिती आहे. मृत आणि जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असून, मोठी गर्दी जमली आहे. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने परिसरातून दोघांना ताब्यात घेतले आहे. इतर संशयीत फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा :
- फॉरमॅट चुकल्याने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद
- Congress president Mallikarjun Kharge : ‘मजुराचा मुलगा काँग्रेस अध्यक्ष झाला, माझ्यासाठी भाऊक क्षण’- मल्लिकार्जुन खर्गे
- DOVE शॅम्पूत आढळला कॅन्सरचा घटक; युनिलिव्हरने बाजारातून परत मागवली उत्पादने
The post जळगाव हादरले! फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघे जखमी appeared first on पुढारी.