
जळगाव : जिल्हा परिषद प्रशासनातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले होते. त्यानुसार आज शिक्षकदिनी १५ शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. महाबळ येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, शिक्षक आमदार सुधीर तांबे, आ. शिरीष चौधरी, आ. अनिल पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह जिल्ह्यातील सत्कारमुर्ती शिक्षक आदी उपस्थित होते.
शेतकर्यांसमोर घोंगावतेय दुहेरी नैसर्गिक संकट
१७ शाळांची मॉडेल म्हणून निवड…
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २२५ खोल्यांचे बांधकामाला सुरूवात करण्यात आली आहे. तर २७८ शाळा खोलींच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यातील १७ शाळांची आदर्शन मॉडेल म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी मराठी शाळेची पटसंख्या वाढलेली दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कार प्राप्त शिक्षक
दर्शना नथ्थू चौधरी (शिरुड, अमळनेर), मनीषा गोकुळ अहिरराव (यशवंतनगर, भडगाव), रवींद्र माणिक पढार (मांडवदिगर, भुसावळ), मनीषा नारायण कचोरे (मनूर बु., बोदवड), उत्तम धर्मा चव्हाण (शिवापूर, चाळीसगाव), विश्वनाथ गोरक्षनाथ पाटील (नागलवाडी, चोपडा), संजय पोपट गायकवाड (मुसळी, धरणगाव), लक्ष्मण वामन कोळी (चंदनबर्डी, एरंडोल), ललिता नितीन पाटील (कानळदा, जळगाव), कीर्ती बाबूराव घोंगडे (पहूर कसबे, जामनेर), विजय वसंत चौधरी (पिंप्रीनांदू, मुक्ताईनगर), अरुणा मुकुंदराव उदावंत (राजुरी, पाचोरा), छाया प्रभाकर भामरे (मोंढाळे, पारोळा), रामराव ज्ञानोबा मुरकुटे (खिरोदा, रावेर), समाधान प्रभाकर कोळी (साकळी, यावल) यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
हेही वाचा :
- सेलिब्रिटींचा गणेशोत्सव 2022…
- सेल्फी विथ बाप्पा…
- Jharkhand Political crisis : मुख्यमंत्री सोरेन यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव, भाजपचा सभात्याग
The post जळगाव : १५ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव appeared first on पुढारी.