जळगाव : “५० खोके, महागाई ओके” महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.१) भुसावळ शहरात जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ “५० खोके, महागाई ओके” अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली.

केंद्र सरकारच्या विरोधात वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी भुसावळमध्ये महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये तहसील कार्यालयापर्यंत खोके डोक्यावरती घेऊन जात, जोरदार निदर्शने करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावणयात आली असून आंतरराष्ट्रीय दरवाढीच्या नावाखाली पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ, रासायनिक खतांची दरवाढ, महागाईचा वाढता दर यामुळे देशातील जनता हवालदील झाली आहे. शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत, गरीबांपासून कामगारांपर्यंत सर्वांना महागाईने होरपळले असून, केंद्र सरकारच्या धोरणांचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला. आंदोलनप्रसंगी प्रदेश सदस्य शकील पटेल, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा सरचिटणीस अतुल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष पुथ्वीराज पाटील, कंडारी गावाचे उपसरपंच विशाल खेडकर, साकेगाव ग्रामपंचायत सदस्य धनराज भोई, विलास कोलते, महेश सोनवणे, युवक कार्याध्यक्ष अनिस लोधी, युवक चिटणीस धर्मराज तायडे, युवक शहर उपाध्यक्ष राहूल वाघ, गुड्डू पिंजारी, गणेश भारंबे, सुमित सपकाळे, आकाश ढीवरे, रूपेश बाविस्कर, निलेश जाधव, सलिम तडवी, नविन लोखंडे, अनुराग परदेशी, सचिन पाटील, विनायक शिरणामे, रविंद्र तायडे, मोहित जोशी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

The post जळगाव : "५० खोके, महागाई ओके" महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन appeared first on पुढारी.