World Yoga Day 2024 : प्राणी व पशूंच्या स्ट्रेच आणि ट्विस्ट, फ्लेक्स आणि पोझवर आधारित इतकी आसने किंवा पोझेसची मानवी जीवनामध्ये देखील शिरकाव केला असून या पोझेस प्राणी व पशुंकडून देखील आल्या आहेत यात ते काही आश्चर्य नाही. चला तर आजच्या जागतिक योगा दिननिमित्ताने विविध प्राण्यांच्या योगासनांवर एक नजर टाकूया…
आम्ही देखील योगा करतो बरं का….आज जागतिक योगा दिन…
वर्षातील इतर दिवसांपेक्षा सर्वांत मोठा दिवस असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होतो. दिवस मोठा असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योगसाधना केल्या जातात. योगा करण्यात पक्षी, प्राणीदेखील मागे नाहीत. या वन्यजीवांची योगाची सफर या दिनानिमित्त. (सर्व छायाचित्रे छाया : आनंद बोरा)
हेही वाचा: