जागतिक रंगभूमी दिन : तरुणाईला रंगभूमीकडे वळविण्याची गरज; सातत्य ठेवल्यास संधी 

नाशिक : अभिनयाची पहिली पायरी म्हणून रंगभूमीकडे बघितले जाते. नाशिकमध्ये तरुणाई रंगभूमीकडे वळली आहे, परंतु त्यात सातत्य नाही. नाटकातून अनेक कलाकार मंडळी पुढे गेली. मात्र आताची तरुणाई सोशल मीडियात गुंतली आहे. त्यातून तिला बाहेर काढून रंगभूमीकडे वळविण्याची गरज जागतिक रंगभूमीदिनी व्यक्त होत आहे. 

उत्साहाबरोबर हवी काम करण्याची जिद्द 
युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने २६ मार्च १६६१ मध्ये जागतिक रंगभूमी दिनाची सुरवात केली. नाटकातील पहिली, दुसरी, तिसरी घंटा वाजल्यानंतर नाटकाचा पडदा उघडतो. प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, प्रबोधनातून समाजाला दिशा दाखविणारे, समाजावर भाष्य करणारे अशा विविध पैलूंनी नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन होते. आताच्या काळात टीव्ही माध्यम महत्त्वाचे असले तरी रंगभूमीकडून मालिका, चित्रपटांत काम करणारे अभिनेते अभिजित खांडकेकर, अनिता दाते, नेहा जोशी अधिक प्रगल्भ झालेले मराठी इंडस्ट्रीत बघायला मिळतात. आताच्या परिस्थितीत तरुणांना अभिनयात कारकीर्द करायची असेल, तर तरुण मंडळींनी अभिनयाचा पाया म्हणून नाटकांत काम केल्यास अधिक संधी प्राप्त होत असल्याचे दिसते.

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

तरुणाईला रंगभूमीकडे वळविण्याची गरज; सातत्य ठेवल्यास संधी 

नाशिकमधून अनेक तरुण नाटकाकडे वळत आहेत. इतर शहरांच्या तुलनेत नाशिकमधील तरुणांचा रंगभूमीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. रंगभूमीकडे तरुण पिढी आकर्षित होत असून, उत्साहाबरोबरच काम करण्याची जिद्द आहे. मात्र त्यात सातत्य ठेवल्यास तरुणाईला अभिनय क्षेत्रात चांगली संधी मिळू शकते. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

 

अभिनयाचे शिक्षण नाटकातूनच पूर्ण होते. शिस्त लागण्याबरोबरच भूमिकेचा कसा अभ्यास करावा, याची कल्पना नाटकातून होते. नाशिकमधील तरुण कलाकारांमध्ये उत्साह दिसत असून, ते चांगले काम करताना दिसत आहे. जे कलाकार रंगभूमीकडून टीव्ही अभिनयाकडे वळतात त्यांना अडचणींचा सामना करावा लागत नसल्याने ते ‘लंबी रेस के घोडे’ म्हणून समोर येतात. -सचिन शिंदे 

 

तरुणांनी फेम म्हणून नाट्य, चित्रपट क्षेत्रात येऊ नये, या क्षेत्रात मनापासून काम केल्यास नक्कीच यश मिळते. आवड म्हणून कमी फेम म्हणून जास्त तरुण मंडळी येत असल्यामुळे त्यांना क्वचितच संधी मिळते. नाटकातूनच रंगमंचावरील मूलभूत गोष्टी, कौशल्य, व्यावहारिकतेचे ज्ञान मिळते. अभिनय वगळता तरुणांना रंगभूमीवरील नेपथ्यपासून, प्रकाश, ध्वनी संयोजन, कॅमेरा हाताळता यायला हवा. 
-प्रणव प्रभाकर