Site icon

जात पडताळणी बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

धुळे;पुढारी वृत्तसेवा: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात बनावट सही शिक्क्यांचे दस्तऐवज सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कर्मचारी मनजीतसिंग जगदीशसिंग बम्मा यांनी तक्रार दिली आहे. यानंतर याप्रकरणातील अल्पवयीन विद्यार्थी तसेच किरण निंबा बाविस्कर यांच्या विरोधात भादवि कलम 465 ,468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जात पडताळणी कार्यालयात यातील आरोप असणाऱ्या संशयितांनी शैक्षणिक विषयक राजपूत भामटा या विमुक्त जात प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केली. आरोपींनी नातेवाईक असणारे विद्यार्‍थ्यांच्‍या  नावाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले. या प्रमाणपत्रावर समिती अधिकाऱ्यांची बनावट सही आणि शिक्के घेण्यात आले होते. राजपूत भामटा या विमुक्त जाती प्रवर्गाचा लाभ मिळवण्याच्या हेतूने हे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात सादर केले गेले.

याप्रकरणी विद्यार्थी तसेच किरण निंबा बाविस्कर यांनी सदर केलेले जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणासोबत जोडले गेलेले जात वैधता प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे माहित असूनही, ते खरेच असल्याचा बनाव केला. ही बाब प्रशासनातील पडताळणी समितीच्या निदर्शनास आल्याने अल्पवयीन विद्यार्थी तसेच किरण निंबा बाविस्कर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा:

The post जात पडताळणी बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Exit mobile version