जिंकलो पण विजयोत्सव नाही, सत्यजित तांबेंची भावूक पोस्ट

Satyajit Tambe

पुढारी ऑनलाईन डेस्क : “विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती. असं ट्विट करत नाशिक पदवीधरमधील अपक्ष  उमेदवार सत्यजित तांबे यांनी माहिती दिली आहे.”(Satyajeet Tambe)

अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा एकूण पाच पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचा काल (दि.२)  निकाल लागला. पण यात नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे सर्वांच लक्ष लागून राहीले होते. दरम्यान मतमोजणी सरु असताना सत्यजित तांबे यांनी  शुभांगी पाटील यांना पिछाडीवर टाकत विजयाकडे वाटचाल केली तेव्हा त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट करत म्हंटलं की, “विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. “

मानस पगार यांचं अपघाती निधन

नाशिक कॉंग्रेस युवा जिलाध्यक्ष मानस पगार यांचा अपघात झाला. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मानस हे सत्यजित तांबे यांचे  सहकारी मित्र होते. मानस यांच्या निधनानंतर सत्यजित तांबे यांनी भावूक पोस्ट लिहीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. 

नाशिक पदवीधर : सत्यजित तांबे विजयी

विधान परिषदेच्या बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित सुधीर तांबे यांचा दणदणीत विजय झाला. शिवसेना पुरस्कृत मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा 29 हजार 465 मतांनी पराभव करत सत्यजित यांची स्वप्नपूर्ती झाली. उमेदवारी करण्यापासून ते मतदानापर्यंत अनेकांनी नानाविध आरोप करत तांबे कुटुंबांना टार्गेट केले, पण कोणतेही प्रत्युत्तर न करता तांबे यांनी संयम पाळला. निकालाची घोेषणा होताच तांबे समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष केला.

हेही वाचा 

The post जिंकलो पण विजयोत्सव नाही, सत्यजित तांबेंची भावूक पोस्ट appeared first on पुढारी.