जिल्हाधिकारींच्या चोरी गेलेल्या पाकिटाचा तपास नाहीच! गर्दीवर कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच 

नाशिक : आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाहात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या पाकिटाची चोरी झाली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत पाकीट हरविल्याची तक्रार दाखल झाली आहे. मात्र, हरविलेल्या पाकिटाचा अद्याप तपास लागलेला नसल्याचे दस्तुरखुद्द पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी स्पष्ट केले.

हजारो नागरिकांची गर्दी असेल तर ती जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांचीच

ते म्हणाले, की पाकीट हरविल्याची तक्रार आली आहे. त्याचा तपास सुरू आहे. 
दरम्यान, विवाहाला ५० निमंत्रितांना परवानगी असली, तरी हजारो नागरिकांची गर्दी होत असेल तर त्यावरील कारवाईबाबत पोलिस आयुक्तांनी जबाबदारी झटकली. आपत्तकालीन स्थितीतील कारवाईबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला अधिकार आहे. जिल्हाधिकारी स्वत: आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आहे. त्यामुळे त्या विभागाकडून तक्रार आलेली नाही.

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

हेही वाचा >  निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड