जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही संभ्रमावस्था कायम! शुद्धीकरण आदेशानंतर शंका-समाधानाचा गोंधळ 

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आदेश काढले असले, तरी त्याबाबत नागरिक व व्यापाऱ्यांत संभ्रमावस्था कायम आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना इथंपासून तर बंदिस्त जागेत खाद्यपदार्थ विक्रीची सोय असलेल्या उपाहारगृहाविषयी शंका आहे. 

बंदिस्त जागेत जेवण्याची सोय असलेल्या ठिकाणांना परवानगी आहे. मद्यविक्रीसाठी बारला परवानगी आहे. जीवनावश्यक वस्तूविक्रीत दूध, अंडी या पदार्थांच्या विक्रीच्या समावेश आहे, तर बेकरी उत्पादनांचा समावेश आहे का, किराणा दुकानात दूध, दही, अंडी यांची विक्री होत असताना किराणा दुकान मात्र बंद ठेवले जातात. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

बाराशे कामगारांना कोरोना 

शहर-जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील ७९ कारखान्यांत आतापर्यंत एक हजार २१२ कामगार कोरोनाची लागण झाली आहे, तर १३ कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय नव्याने १०१ जणांना बाधा झाल्याचे पुढे आले आहे. औद्योगिक वसाहतीतील कोरोना आढावा घेण्यात आला असून, त्यात साधारणपणे ७९ कंपन्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. नव्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने औद्योगिक कंपन्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाय वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र त्याविषयी व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. 

पोलिस यंत्रणाही संभ्रमात 

कोरोनाची रुग्णसंख्या कुठे जास्त आहे, कुठे कमी, याविषयी पोलिसांना माहिती मिळताच सायंकाळी सात वाजले, की सरसकट सगळीकडे शिट्या फुंकत कारवाया सुरू करतात. त्यात, भाजीविक्रेतेही भाज्या सोडून पळू लागतात. कोरोनाची लागण झालेल्यांना शिक्के मारून क्वारटांइन केले जात नाही. कंन्टेन्मेंट झोन केलेले नाहीत. त्यामुळे बंदोबस्त लावयचा कुठे, याविषयी पोलिस यंत्रणाही आणि त्या त्या भागातील पोलिस ठाण्यांच्या यंत्रणाही संभ्रमात आहे. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

कारवाईचा प्रकार शहर ग्रामीण एकुण 

सार्वजनिक ठिकाणी उल्लंघन १४८८ ४०३३ ५५२१ 
लॉन्स-मंगल कार्यालय कारवाया २३ १२ ३५ 
हॉटेलवरील कारवाया ३२ ११० १४२ 
चित्रपटगृहावरील कारवाया ०२ ०० ०२ 
शॉपिंग मॉल्स, दुकानांवर कारवाया ७१ १०१ १७२ 
धार्मिक स्थळांवर कारवाया १७ २४ ४१ 
दंड आकारणी ३ लाख ३३ हजार १ लाख ८३ हजार ५ लाख १६ हजार