जिल्हा परिषदेतील बनावट नियुक्तीपत्र प्रकरणातील मुख्य संशयित अद्याप फरारीच 

नाशिक : लोकायुक्तांच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संगणकीकृत सहीने बनावट ओळखपत्र तयार करण्याच्या या प्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांना मंगळवार (ता. १५)पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. मात्र, मुख्य संशयित उदावंत अद्याप फरारी आहे.

लवकरच​ माहिती समोर येण्याची शक्यता

जिल्हा परिषदेतील बनावट नियुक्तीपत्राद्वारे नियुक्तीच्या प्रकरणातील मुख्य संशयित उमेश उदावंत अद्याप फरारी असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत. जिल्हा परिषद कार्यालयातील एका संशयीत कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले आहे.उदावंत पोलिसांच्या हाती लागताच कार्यालयातील अन्य कुणाचा यात सहभाग आहे, याची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

पोलिसांनी परिसरातील रहिवाशांशी चर्चा केली

पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो घर बंद करून फरारी आहे. पोलिसांनी परिसरातील रहिवाशांशी चर्चा केली. मात्र, समाधानकारक माहिती मिळू शकली नाही. आता त्याचा मोबाईल क्रमांक ट्रेस करून त्याचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे यांनी सांगितले. 
दरम्यान, बनावट ओळखपत्र तयार करणारा संशयित कर्डिले याच्या रविवार कारंजा येथील दुकानातील संगणक व अन्य संशयास्पद वस्तू रविवारी (ता.१३) पोलिसांनी ताब्यात घेतल्या. त्यातील माहितीची तपासणी करण्यात येत आहे. त्यातून काही ठोस पुरावे हाती लागतात का, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे श्री. वऱ्हाडे यांनी सांगितले.  

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा