जिल्हा परिषद बनावट नियुक्तीपत्र प्रकरण : सुमारे १८० जणांची फसवणुूक; रक्कम कोटीच्या घरात जाण्याची शक्यता

जुने नाशिक : जिल्हा परिषद बनावट नियुक्तीपत्र प्रकरणातील पिडीतांची सख्या वाढत आहे. आतापर्यंत सात पिडीतानी पोलिसांशी संपर्क साधला आहे. सुमारे १८० असे पिडीत असल्याने प्रत्येकाकडून हजारांमध्ये रक्कम घेतली असल्याने फसवणूकीची रक्कम कोटीच्या घरात जाण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. 

मुख्य संशयीतासह चौघे ताब्यात

लोकआयुक्तांच्या नावाने बनावट नियुक्तपत्र आणि तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संगणकीय सहीचा वापर करत बनावट ओळख पत्र तयार करण्याचे प्रकरण शुक्रवार (ता.४) रोजी उघडकीस आले होते. भद्रकाली पोलिसात संशयीत उमेश उदावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासात आतापर्यंत मुख्य संशयीत उमेश उदावंत, जिल्हा परिषद कर्मचारी रविंद्र वाघ, ओळखपत्राची छपाई करणारा अंकुश कर्डिले तसेच बनावट सही करणारा संशयीत संतोष जाधव अशा चौघाना ताब्यात घेतले आहे. तपासी अधिकारी संदीप वऱ्हाडे अदीक तपास करत आहेत.

हेही वाचा >> मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो सोहळा ठरला अखेरचा; जीवलग मित्राची कायमची ताटातूट ​

प्रकरण कोटीच्या घरात जाणार

याप्रकरणात फसवणूक झालेल्यानी भद्रकाली पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आतापर्यंत सात पिडीत उमेदवारानी तपासी अधिकारी वऱ्हाडे यांची भेट घेतली आहे. त्यानी त्याचे जबाब नोंदवून घेतले आहे. याप्रकरणात सुमारे १८० पिडीत उमेदवार आहे. त्यातील प्रत्येकाकडून संशयीताने हजारांच्या प्रमाणात रक्कम घेतली आहे. सात जणांकडून त्याने सुमारे अडीच ते तीन लाख रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. प्रत्येकांचा विचार केला तर फसवणूकीची रक्कम एक ते दिड कोटी किंवा त्यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. एकुणच प्रकरण कोटीच्या घरात जाणार हे निश्‍चीत.

पोलिसांच्या पुढील तपासाबद्दल उत्सुकता

दुसरीकडे मुख्य संशयीताने इतकी रक्कम घेतली आहे. तर ती रक्कम कुठे ठेवली. किंवा रकमेतून काही खरेदी केले आहे. का याची माहिती प्राप्त शकली नाही. त्या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत. त्यामुळे आणखी संशयीतांच्या नावासह जिल्हा परिषदेतील अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासात काय बाहेर येते याबाबतची उत्‍सुकता लागली आहे. 

हेही वाचा >> चार वर्षाच्या चिमुरड्या 'राई'ने जिंकलं सर्वांचं मन! तीन तास नॉनस्टॉप कळसुबाई सर ​

नाशिकरोड कनेक्शन 

या सर्व प्रकरणात नाशिकरोडचा भूमिका मोठी आहे. मुख्य दोन्ही संशयीत नारायण बापूनगर आणि उपनगर भागात राहणार आहे. त्याना अटक नाशिकरोड भागातूनच झाली आहे. शिवाय ज्या पिडीत उमेदवारामुळे प्रकरण उघडकीस आले तेही नाशिकरोड भागात रहाणारे आहेत. इतकेच नव्हे तर बनावट कागदपत्राची छपाई देखील नाशिकरोडला झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रकरणाच्या तपासाचा शेवट देखील नाशिकरोडला होणार की काय असे वाटू लागले आहे.