जिल्हा परिषद बनावट नियुक्तीप्रकरणी निवृत्त कर्मचाऱ्यास कोठडी; संशयितांची संख्या सहा 

जुने नाशिक : जिल्हा परिषद बनावट नियुक्तिपत्र प्रकरणातील निवृत्त महिला कर्मचारीस अखेर भद्रकाली पोलिसांनी अटक केली. दोन महिला कर्मचाऱ्यांची नावे समोर आली होती. त्यातील सध्या कार्यालयात कार्यरत महिलेस यापूर्वीच सोमवारी (ता.२५) अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

तपासी अधिकारी संदीप वऱ्हाडे यांनी जिल्हा परिषद कर्मचारी रवींद्र वाघ, बनावट ओळखपत्र छपाई करणारा अंकुश कर्डिले, अधिकाऱ्यांची सही करणारा संतोष जाधव तसेच, मुख्य संशयित उमेश उदावंत या चौघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत दोन महिला कर्मचाऱ्यांची नावे समोर आली होती. त्यातील एक महिला काही दिवसांपूर्वी निवृत्त झाली असून, दुसरी सध्या कार्यरत आहे. दोघींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बुधवारी (ता.२०) सुनावणी झाली. वऱ्हाडे यांनी  महिला कर्मचाऱ्याची पोलिस कोठडीची आवश्‍यकता असल्याचे न्यायालयास पटवून दिले होते. त्यानंतर त्यांचा अर्ज नामंजूर झाला. पोलिसांची त्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू होती. त्यानुसार सोमवारी (ता.२५) पोलिसांनी जिल्हा परिषदेत सध्या कार्यरत असलेल्या दीपांजली देशमुख या महिला कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली नव्हती. उपचार पूर्ण करून त्या घरी परतल्या होत्या. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. निवृत्त महिला कर्मचारी मात्र पोलिसांना मिळून आल्या नाहीत. पोलिस त्यांचा शोध घेत असताना शुक्रवारी (ता.२९) निवृत्त महिला कर्मचारी मंगला सरोदे (रा. शिवाजी चौक, सिडको) यांना न्यायालयातून ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी त्या न्यायालयात हजर झाल्या होत्या. तपासी अधिकारी वऱ्हाडे यांना माहिती मिळाली. त्यांनी न्यायालयात हजर होत न्यायालयास गुन्ह्याची माहिती देत त्यांची पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांना त्यांचा ताबा देत सोमवार (ता.१)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आत्तापर्यंत पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यातील पाच संशयित मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. सरोदे सध्या पोलिस कोठडीत आहेत. 

 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

दहा तक्रारदार आले समोर 

बनावट नियुक्तीप्रकरणी भद्रकाली पोलिसांचा तपास सुरू आहे. फसवणूक झालेल्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. तसेच ‘सकाळ ने सातत्याने पाठपुरावा सुरू असून, आत्तापर्यंत दहा तक्रारदार समोर आले आहे. सुमारे तीन लाख २१ हजार रकमेचा फसवणुकीचा आकडा झाला आहे. तक्रारदार वाढल्यास फसवणूक झालेल्या रकमेचा आकडाही वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. 

हेही वाचा - बालविवाह झालेल्या 'त्या' दुर्दैवी मुलीचा मृत्यू; आईची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार