जिल्हा परिषद बनावट नियुक्तीपत्र प्रकरणी चौथा संशयित गजाआड 

जुने नाशिक : जिल्हा परिषद बनावट नियुक्तीपत्र प्रकरणी भद्रकाली पोलिसानी आणखी एका संशयीतास रविवार (ता.१५) रात्री अटक केली. पूर्वीच्या दोन संशयीतासह मुख्य संशयीत तसेच बनावट सही करणारा नवीन संशयीत ताब्यात घेतल्याने संशयीताची संख्या चार झाली आहे. 

अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

लोक आयुक्तांच्या नावाने बनावट नियुक्तपत्र तसेच मुख्य कार्यकारी असलेल्या आणि नसलेल्यांच्या नावाने संगणकीय सही करुन बनावट ओळखपत्र तयार फसवणूकीच्या प्रकाराची उकल होत आहे. हितेंद्र नायक बेरोजगाराला शुक्रवार (ता.४) जिल्हा परिषद आरोग्य विभागात पर्यवेक्षक पदावर हजर होण्यासाठी गेले. प्रभारी प्रशासन अधिकारी प्रकाश थेटे यांच्या सतर्कतेमुळे बनावट नियुक्ती पत्राचा प्रकार उघडकीस आला. मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला. तपासी अधिकारी संदीप वऱ्हाडे यांनी तपासात जिल्हा परिषद कर्मचारी रविंद्र वाघ आणि ओळखपत्राची छपाई करणारा संशयीत अंकुश कर्डिले या दोघांना अटक केली. त्यांच्या माहितीनुसार मुख्य संशयीत उमेश उदावंत असल्याचे पुढे आल्यावर रविवारी (ता.१५) दुपारी त्याला नाशिक रोडला जय भवानी रोडला अटक करण्यात आली. 

दोघांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात

तिघांच्या अटकेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र राठोड यांची बनावट सही करणार संशयित संतोष पुंडलीक जाधव (वय.४३,रा.संजय गांधीनगर उपनगर) याचे नाव समोर आले. पोलिस त्याच्या घरी पोहचले.मात्र तो घरात आढळून आला नाही. पोलिसांनी मुख्य संशयीत उमेश उदावंत आणि संतोष जाधव यांना आज बुधवार (ता.१६) न्यायालयात हजर केले असतांना दोघांना चार दिवसांची शनिवार (ता.१९) पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. तर संशयीत रविंद्र वाघ आणि अंकुश कर्डिले यांची मंगळवार (ता.१५) पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

नसलेल्या अधिकाऱ्याची सही 

जिल्हा परिषेदत मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कधीही कुणी राजेंद्र राठोड नावाचे व्यक्ती नव्हते. पण संशयितांनी त्या नावाने देखील सहीचे बनावट कागदपत्र बनविले आहे. संशयित संतोष जाधव याने ती सही केली असल्याचे संशयीत उदावंत याने सांगीतले. अधिकारी नसलेल्या अधिकाऱ्याची सही करुन पैशाच्या हव्यासा पोटी संशयितांनी कारनामे केल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...