जिल्हा बँकेकडून होणारी सक्तीची कर्जवसुली थांबवा; शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे कृषिमंत्र्यांना साकडे

लासलगाव (जि. नाशिक) : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धडक कर्ज वसुली मोहिम राबवत आहे. सदर वसुली तत्काळ थांबविण्याचे साकडे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना घातले. 

शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव करणे, लिलाव पूर्व नोटीस, अपसेट प्राईस मंजुरी, इतर बँक खाते गोठवणे, शेतजमीन जप्त करणे यासारखे प्रकार सध्या जिल्हा बँकेकडून सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीतून जात आहे. कोरोनामुळे झालेले नुकसान, अवकाळी पाऊस, शेतमालाचे पडलेले भाव याचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडून वसुली केल्यास आत्महत्या वाढू शकतात. या परिस्थितीचा विचार करता धडक वसुली मोहिम त्वरित थांबवण्यात यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन होळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, काँग्रेसचे संजय पाटील, खेडगावचे उपसरपंच प्रशांत पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. 

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप