जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक! दिवसभरात तब्‍बल १ हजार ३३० पॉझिटिव्‍ह

नाशिक : जिल्‍ह्‍यात गेल्‍या काही दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या  बाधितांच्‍या संख्येत चिंताजनक वाढ होते आहे. बुधवारी (ता.१०) दिवसभरात तब्‍बल १ हजार ३३० बाधितांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. दिवसभरात उपचार घेणाऱ्या सहा बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येतही मोठी वाढ झाली असून, सध्या जिल्‍ह्‍यात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या ५ हजार १७१ वर पोहोचली आहे.

नाशिक महापालिका हद्दीतील सर्वाधिक बाधित

गेल्‍या काही दिवसांपासून विशेषतः फेब्रुवारी महिन्‍याच्‍या १५ तारखेनंतर जिल्‍ह्‍यात आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ होतांना दिसते. त्‍यातच बुधवारी (ता.१०) नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांच्‍या संख्येने जुने विक्रम मोडीत काढले. दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील सर्वाधिक ७६८, नाशिक ग्रामीणचे ३८७, मालेगाव महापालिका हद्दीतील १३८ तर जिल्‍हा बाहेरील ३७ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

सहा बाधितांचा मृत्‍यू

सहा मृतांमध्ये नाशिक शहरातील एक, नाशिक ग्रामीणमधील तीन तर जिल्‍हा बाहेरील दोन बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. शहरात दिंडोरीरोडवरील ५५ वर्षीय महिला, नाशिक ग्रामीणमध्ये सिन्नरच्‍या ७३ वर्षीय महिला, दौडगाव येथील ७५ वर्षीय महिला, देवळा येथील ७५ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. नाशिकला उपचार घेत असलेल्‍या पालघर येथील ७० वर्षीय पुरुष आणि जळगाव येथील ६० वर्षीय महिला बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिकच्‍या ३१५, नाशिक ग्रामीणमधील १२५, मालेगावच्‍या ८४ तर जिल्‍हा बाहेरील पंचवीस रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO