जिल्ह्यात कोरोनाचे दिवसभरात सात बळी, बरे झाले २३२ रूग्‍ण 

नाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे होणार्या मृत्‍यूचे प्रमाण घटत असतांना, मंगळवारी (ता.१) मात्र दिवसभरात सात रूग्‍णांचा जिल्‍ह्‍यात उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. मृतांमध्ये मालेगाव तालुक्‍यातील २८ वर्षीय युवकाचा समावेश आहे. दिवसभरात २८२ कोरोना बाधित आढळून आले तर बरे झालेल्‍या रूग्‍णांची संख्या २३२ राहिली. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत ४३ ने वाढ झाली असून, सद्य स्‍थितीत २ हजार ८३३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

बाधितांमध्ये नाशिक शहरातील १८४

मंगळवारी (ता.१) आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १८४, नाशिक ग्रामीणमधील ७९, मालेगावचे नऊ तर जिल्‍हाबाहेरील दहा रूग्‍णांचे अहवाल पॉझिटीव्‍ह आले. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील १०९ रूग्‍ण, नाशिक ग्रामीणचे ११८, मालेगावचा एक तर जिल्‍हाबाहेरील चार रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. सात मृतांमध्ये नाशिक शहरातील दोन, ग्रामीणमधील पाच रूग्‍णांचा समावेश आहे. शहरातील टाकळी परीसरातील ६३ वर्षीय पुरूष, आडगाव येथील ७५ वर्षीय पुरूष रूग्‍णाचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमध्ये कोलवाडी (ता.निफाड) येथील ४६ वर्षीय पुरूष, मालेगाव तालुक्‍यातील २८ वर्षीय पुरूष, दिंडोरीच्‍या ६६ वर्षीय पुरूष, नांदगावच्‍या ७५ वर्षीय पुरूष, मुल्‍हेर (सटाणा) येथील ७३ वर्षीय पुरूष रूग्‍णाचा समावेश आहे. 

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय

एकूण बाधितांची संख्या १ लाख ०१ हजार ४१९

दरम्‍यान जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ०१ हजार ४१९ झाली असून, यापैकी ९६ हजार ७८८ रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. १ हजार ८९८ रूग्‍णांचा आतापर्यंत मृत्‍यू झाला आहे. तर २ हजार ८३३ रूग्‍ण उपचार घेत आहेत. दिवसभरात दाखल रूग्‍णांमध्ये नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ७६३, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ३३, मालेगाव महापालिका हद्दीत ७, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात नऊ, जिल्‍हा रूग्‍णालयात पाच रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ८७७ रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील ४६१, नाशिक शहरातील ३८०, मालेगावच्‍या ३६ रूग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती.  

हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत