जिल्ह्यात कोरोनाचे बळी थांबेनात, दिवसभरात ३३ बाधितांचा मृत्यू

नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंची संख्या अद्यापही आटोक्‍यात आलेली नाही. शुक्रवारी (ता. ९) दिवसभरात ३३ बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला असून, त्यापैकी तब्‍बल २६ मृत नाशिक ग्रामीणमधील आहेत. तीन हजार ७१२ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या तीन हजार २९५ होती. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात ३६ हजार २३५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

शुक्रवारी झालेल्‍या मृत्‍यूंमध्ये तब्‍बल २६ मृत नाशिक ग्रामीणमधील असून, नाशिक शहरातील पाच, जिल्ह्याबाहेरील दोन बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये येवल्‍या तालुक्‍यातील आठ बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. नांदगाव, निफाड, सिन्नरच्‍या दोन, दिंडोरी व चांदवड तालुक्‍यांतील तीन, नाशिक व मालेगाव तालुक्‍यांसह त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, कळवण, देवळा तालुक्‍यांतील प्रत्‍येकी एका बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. नगर व औरंगाबाद येथील बाधितांचा नाशिकला उपचार घेतांना मृत्‍यू झाला आहे.दिवसभरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील एक हजार ९४२, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ६६६, मालेगाव महापालिका हद्दीतील ५६, तर जिल्ह्याबाहेरील ४८ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

पाच हजार ९१० अहवाल प्रलंबित 

सायंकाळी उशीशिरापर्यंत जिल्ह्यातील पाच हजार ९१० रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी दोन हजार ७५८ नाशिक ग्रामीणमधील आहेत, दोन हजार ६५९ नाशिक महापालिका क्षेत्रातील, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील ४९३ रुग्ण आहेत. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात तीन हजार ६३१ रुग्‍ण दाखल झाले आहेत. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील तीन हजार २१०, तर जिल्‍हा रुग्‍णालयात २३, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात ५६ रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये तीनशे, मालेगाव महापालिका क्षेत्रात ५२ रुग्‍ण दाखल झाले आहेत.  

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 