जिल्ह्यात विकेंडला फक्त जीवनावश्यक सेवा सुरू; कडकडीत बंद पाळण्याचे प्रशासनाचे आदेश  

नाशिक  : शासनाच्या ‘ब्रेक द चेन’चे कोरोनाविषयक निर्बंध झुगारून दुकाने सुरू करण्यासाठी आक्रमक असलेल्या व्यावसायिक संघटना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील सकारात्मक चर्चेमुळे शुक्रवारी (ता. ९) व्यावसायिकांनी बंद ठेवला. दरम्यान, उद्या (ता. १०)पासून जिल्ह्यातील शनिवार- रविवारचा पाचवा कडक लॉकडाउन असेल. त्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची तयारी केली आहे. नाशिकला शनिवार व रविवार असे दोन दिवस कडकडीत बंद पाळण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. जीवनावश्यक वर्गवारीतील नऊ आणि आर्थिक वर्गवारीतील सहा याप्रमाणे साधारण १५ सेवा सुरू ठेवण्‍यास मान्यता दिली आहे. 

गुरुवारी (ता. ८) जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अधिसूचना काढून आणखी काही आस्थापनांना सोमवार (ता. १२)पासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शनिवारी व रविवारी बँकांसह वित्त संस्था आणि शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना दोन दिवस परवानगी असेल. त्यात, किराणा, दूध, वीज, दूरध्वनी, खाद्यपदार्थ विक्री आणि वाहतूक सेवा सुरू राहतील. 

बंदोबस्त आहे तोच 
शनिवार- रविवारी शासकीय कार्यालयांना सुटी असून, वीकेंड बंदमध्ये केवळ किराणा, भाजीपाला, अन्नधान्य, दूध, खाद्यपदार्थ, वाहतूक सेवा, पेट्रोलपंप, मेडिकल दुकान, रुग्णालय या सेवाच सुरू राहणार आहेत. बाजारपेठेत प्रवेशासाठी १५ दिवसांपूर्वी पोलिसांनी तात्पुरत्या पासची पद्धत सुरू करून बॅरिकेडिंग केले आहे. तेच बॅरिकेडिंग असेल. विशेष वेगळी सोय केलेली नाही. बंदोबस्त आहे तोच असणार आहे. 

सोमवारपासून या सेवा सुरू 
शासनाने खरिपाच्या तोंडावर कृषी निविष्ठांसह शेतीशी निगडित व्यवसाय सुरू होणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहतूक व्यवसायाला पूरक टायर विक्री, गॅरेज, सर्व्हिस सेंटर, वर्कशॉप स्पेअरपार्ट विक्री सुरू होणार आहे. बाजार समितीशी निगडित सेवा आणि खाद्यपदार्थांची पार्सलद्वारे विक्री करण्यास परवानगी दिली आहे. शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी नवीन आदेश काढून त्यात, मॉल, बिग बझार, पासपोर्ट ऑफिस, आपले सरकार केंद्र, सेतू कार्यालय सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

आज हे सुरू राहील. (सकाळी सात ते सायंकाळी सात) 
रुग्णालय, हॉस्पिटल, मेडिकल, किराणा दुकान, बाजार समिती, भाजी बाजार, फिरती विक्री उपाहारगृह, हॉटेल, खाद्यान्न पार्सल, रिक्षा, टॅक्सी, बससह वाहतूक सेवा, ऑनलाइन सरकारी सेवा केंद्र 

८९५ जणांच्या तपासण्या 
१७ मार्चपासून शहरातील परिमंडल दोन कार्यक्षेत्रात २५ लाखांहून अधिक दंड वसूल झाला असून, दंड भरू न शकणाऱ्या ८९५ 
जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. विनामास्क दोन हजार ८४३ लोकांवर कारवाईचा बडगा उगारत १५ लाख ५७ हजार ६०० रुपये दंड आकारला. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या २३ थुंकीबहाद्दरांवर कारवाई करत २४ हजारांचा दंड वसूल केला. रात्रीच्या संचारबंदीचे हेतूपुरस्पर उल्लंघन करणाऱ्या ३५ नागरिकांकडून ५२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. आतापर्यंत ८९५ नागरिकांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. २२८ आस्थापनावर कारवाई करून पोलिसांनी आतापर्यंत सात लाख ७५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. 

बंद अंर्तगत पोलिस कारवाया 
विनामास्क फिरणारे कारवाई संख्या एकूण दंड कलम १८८ केसेस अ‍ॅन्टिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आढळलेले 
पंचवटी ५१६ १६,६७०० ८ ३९ १ 
आडगाव ३८३ १४९१०० ० ० ० 
म्हसरूळ ४६२ १८२००० ० ० ० 
भद्रकाली ८४८ २१५७०० १ ० ० 
सरकारवाडा ३३८ ९८३०० ८ ६ १ 
गंगापूर ८२९ २८६५०० २३ ४६ ० 
मुंबई नाका ६५१ १९३९०० १ १९ ० 
एकूण ४०२७ १२,९२,२०० ४१ ११० २ 

सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या आस्थापना एकूण दंड १८८ केसेस 
पंचवटी ५८ ५७००० ० 
आडगाव ३० ३०००० ० 
म्हसरूळ ३० ३०००० ० 
भद्रकाली ३ १२००० १ 
सरकारवाडा १२ १२००० ० 
गंगापूर ४८ ५६००० ३ 
मुंबई नाका २४ २४००० ० 
एकूण २०५ २२१००० ४ 
 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

वेळ न पाळणाऱ्या आस्थापना एकूण दंड संचारबंदी कारवाई एकूण दंड १८८ केसेस 
पंचवटी ८३ ११७००० ३७ ३३५०० २ 
आडगाव ९ ४६००० २० १०००० ० 
म्हसरूळ ७ ७००० ३३ १४५०० ० 
भद्रकाली ५ २१००० २२ ११५०० ० 
सरकारवाडा ४० ११३००० ० ० ० 
गंगापूर २२ ६६००० ० ० २५ 
मुंबई नाका २२ २२००० ९ ५००० ४५ 
एकूण १८८ ३९२००० १२१ ७४५०० ७२