जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णवाढीचा भडका! ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या 12 हजार 380 वर

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोनाचा भडका होऊ लागला असून, दर दिवशी आढळणार्या कोरोना बाधितांची संख्या रोज नवीन विक्रम मोडत आहे. गुरुवारी (ता.18) दिवसभरात 2 हजार 421 कोरोना बाधित आढळून आले आहेत. दिवसभरात कोरोनावर मात केलेल्‍या रुग्‍णांची संख्या 888 राहिली. चौघा बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत 1 हजार 529 ने वाढ झाली असून, सध्या जिल्‍ह्‍यात उपचार घेत असलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या 12 हजार 380 वर पोहोचली आहे. 

नाशिक शहरातील 1 हजार 356

यापूर्वी काल (ता.17) दिवसभरात 2 हजार 146 रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले होते. यापूर्वी एका दिवसात इतक्‍या मोठ्या संख्येने कोरोना बाधित आढळलेले नव्‍हते. दरम्‍यान गुरुवारी (ता.18) या संख्येचाही विक्रम मोडीत निघाला. दिवसभरात 2 हजार 421 रुग्‍णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील 1 हजार 356, नाशिक ग्रामीणमधील 838 कोरोना बाधित रुग्‍ण आढळून आले आहेत. मालेगावला 184 तर जिल्‍हा बाहेरील 43 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. दिवसभरात चार बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला असून, यापैकी प्रत्‍येकी दोन नाशिक शहर व नाशिक ग्रामीणमधील आहेत. मृतांमध्ये त्रिमुर्ती चौक परीसरातील 46 वर्षीय महिला, त्र्यंबकरोडवरील 65 वर्षीय पुरुष तर नाशिक ग्रामीणमध्ये निफाड तालुक्‍यातील 66 वर्षीय पुरुष, तळेगाव रोही (ता.चांदवड) येथील 62 वर्षीय बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

3 हजार 344 अहवाल प्रलंबित,दिवसभरात 2 हजार 493 संशयित

कोरोनाबाधित जिल्‍हास्‍तरावरील चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी सांयकाळी उशीरापर्यंत 3 हजार 344 रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात सर्वाधिक 1 हजार 847 प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक शहरातील 917, मालेगावमधील 580 अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दिवसभरात 2 हजार 493 रुग्‍ण दाखल झाले. यापैकी 2 हजार 352 रूग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात 16 रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील 98, मालेगावला 25 संशयित दाखल झाले आहेत. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा