जिल्ह्यात ३३ वैद्यकिय अधिकारी नेमणार; एमबीबीएस मिळत नसल्याने बीएएमएसच्या मुलाखती 

नाशिक : जिल्ह्यातील वैद्यकीय आधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा रुग्णालयातर्फे शुक्रवारी (ता.२६) वैद्यकीय आधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी पदाअभावी जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांवर परिणाम होत आहे.

पंधरा तालुक्यांच्या अवाढव्य नाशिक जिल्ह्याच्या वैद्यकीय सेवेवर लगतच्या जिल्ह्यातील रुग्णांचा ताण असतो. पालघर, ठाणे जिल्ह्यांतील विविध वाड्यांवरील रुग्ण येत असतात. दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पुरेसे वैद्यकीय अधिकारी नसल्याने उपचार मिळविताना रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. 

प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय 

एमबीबीएससाठी एमबीबीएस पदाचे अधिकारी मिळत नसल्याने बीएएमएस अधिकारी घेण्यात आले. नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शुक्रवारी दिवसभर मुलाखती झाल्या. संबंधित वैद्यकिय अधिकारी अकरा महिन्यांच्या वेतन करारावर घेतले जाणार आहेत. त्यासाठी ३३ जणांच्या नियुक्तीशिवाय १७ जण अतिरिक्त अधिकाऱ्याची प्रतीक्षा यादी केली जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदाचा प्रश्न मिटणार आहे. 

हेही वाचा > ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल'';...

लसीकरणाची तयारी 

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या तयारीवर प्रशासनाने लक्ष पुरविले आहे. जिल्ह्यातील ६९ हजारांवर कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. शंभर टक्के लसीकरणासाठी केलेल्या नियोजनानुसार आतापर्यत ५६ हजार कर्मचाऱ्यांना लस देणे अपेक्षित असताना ४१ हजारांवर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. जिल्हाभरातील लसीकरणासाठी तयारी सुरू आहे. त्यात, प्रतिकर्मचारी १०० जणांचे लसीकरण करू शकेल, अशा पद्धतीने एक हजार ६९ लस देणारे व्हॅस्केलेटर तयार आहे.  

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना